84 व्या साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला उत्साहात ग्रंथदिंडी

December 24, 2010 1:07 PM0 commentsViews: 3

24 डिसेंबर

84 व्या साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात ग्रंथदिंडी निघाली आहे. जनकवी पी.सावळाराम यांच्या नौपाडा इथल्या घरापासून ही ग्रंथ दिंडीनिघाली. या दिंडीत ठाण्यातल्या शाळेतली मुलं मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. मुलांनी पुस्तकांचे डिझाईन असलेल्या प्रतिकृती या ग्रंथदिंडीचे आकर्षण आहे. पुस्तकांचे वाचन वाढवण्यासाठीचे संदेश त्यांनी दिले जात आहे. ठाण्यातला ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारा तारपा नाचही दिंडीत सहभागी झाला. सनई-चौघड्यांच्या तालावर ही ग्रंथदिडी राम मारुती रोडवरुन दादोजी कोंडदेव स्टेडिअम कडे चालली आहे. या दिंडीत अनेक नामवंत साहित्यिक, मान्यवर सहभागी झाले आहेत

close