सायनाला कारणे दाखवा नोटीस

December 24, 2010 1:29 PM0 commentsViews: 1

24 डिसेंबर

भारताची बॅटमिंटन स्टार सायना नेहवालला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढच्या वर्षी तैपईला होणार्‍या सुपर सीरिजच्या फायनल्समधून सायनाने माघार घेतली आहे. यामुळेच फेडरेशनने ही नोटीस बजावल्याचे कळत आहे. सायनाचे दुखापतीचे पुरावे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने मान्य केले नाहीत तर पुढे जाऊन तिला शिस्तभंगाविरूद्धच्या कारवाईलाही सामोर जावं लागेल आणि त्याचबरोबर 5 हजार डॉलर्स दंडही भरावा लागेल अशी माहिती सुत्रानी दिली आहे. जागतिक क्रमवारित चौथ्या स्थानावर असलेल्या सायनाने उजव्या पायाला दुखापत झाल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली.

close