संमेलन स्थळी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

December 24, 2010 1:56 PM0 commentsViews: 1

24 डिसेंबर

ठाण्यात होत असलेल्या 84 वे साहित्य संमेलन बंद पाडू असा इशारा दिलेल्या संभाजी ब्रिगेडने ग्रंथ दिंडी निघण्या अगोदरदादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर आंदोलन केले. यावेळी स्टेडियमबाहेर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाचा फलक लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यावरून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या 18 लोकांना ताब्यात घेतलं आहे.

close