हृतिक झळकणार स्टारडस्टच्या कव्हरपेजवर

December 24, 2010 2:56 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबर

संजय लीला भन्साळीच्या गुजारीश मध्ये झक्कास परफॉर्मन्स दिल्यानंतर हृतिक रोशन परत एकदा प्रकाशझोतात आला आहे. बॉलिवूडमध्ये फेमस असलेल्या स्टारडस्ट या मासिकाच्या या आठवड्यातील कव्हरपेजवर हृतिक झळकणार आहे. नुकतेच या मासिकाची नवी आवृत्ती लाँच करण्यात आली.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार्‍या स्टारडस्ट मासिकाच्या कव्हरपेजवर हृ्‌तिकची छबी झळकणार आहे. हृतिक यावेळी खूप थकल्यासारखा वाटत होता. बाहेरगावी एक इव्हेंट आटपून तो डायरेक्ट या कार्यक्रमाला पोहचला होता. पण आपल्या आगामी अग्निपथ आणि क्रिश या सिनेमांचा विषय निघाल्यावर मात्र हृतिक त्याबद्दल बोलायला उत्साहीत झाला होता.

close