कलमाडींच्या घरी सीबीआयचे छापे ; चौकशीला सामोरं जाण्याची तयारी – कलमाडी

December 24, 2010 5:14 PM0 commentsViews: 3

24 डिसेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांच्या दिल्ली, पुणे आणि मुंबईतल्या घरांवर आज सकाळी सीबीआयने छापे टाकायला सुरुवात केली आहेत.कलमाडी यांच्या दिल्ली आणि पुण्याच्या घरावर सीबीआयने धाड टाकली. सीबीआयच्या सगळ्या चौकशीत आपण सहकार्य केल्याची प्रतिक्रिया सुरेश कलमाडी यांनी दिली. आपण एकट्याने कोणताच निर्णय घेतला नाही असं सांगत त्यांनी कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी कलमाडींचे निकटवर्तीय, संजय महेंद्रू, टी.एस दरबारी आणि एम.जयचंद्र यांच्या घरावर छापे टाकले होते. सीबीआयने कलमाडींच्या दिल्ली आणि पुण्यातल्या 6 ठिकाणांवर छापे टाकलेत. यामध्ये कलमाडींच्या पुण्यातल्या साई पेट्रोल पंपाचाही समावेश आहे. त्याबरोबरच दिल्लीतल्या ऑलिम्पिक मुख्यालयावरही सीबीआयने छापे टाकलेआहेत.पुण्यातल्या सुरेश कलमाडींच्या कलमाडी हाऊस या एरंडवणे भागातल्या बंगल्यावर सीबीआयने सकाळी कारवाई सुरू केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छाप्याच्या कारवाईनंतर सीबीआय सुरेश कलमाडींची चौकशी करू शकते गरज पडली तर छाप्यांच्या कारवाई दरम्यानही सुरेश कलमाडींकडून सीबीआय काही प्रश्नांची उत्तर घेऊ शकते.आजच्या धाडीत सुरेश कलमाडींचा पीए मनोज भोरे यांच्या घरावरही सीबीआयने छापे टाकले आहेत. मनोज भोरे हे सुरेश कलमाडींचे सचिव तर आहेतच शिवाय कलमाडींचे पुण्यातले सगळे व्यवहारही ते सांभाळतात. त्यामुळेच सीबीआयने भोरेंच्याही घरावर छापा टाकून महत्वाचे दस्तावेज जप्त केल्याचे समजते.या ठिकाणावर छापे पडले

-कलमाडी यांच्या पुणे, दिल्ली आणि मुंबईतल्या निवासस्थानी छापे-दिल्लीतल्या आयोजन समितीच्या कार्यालयावर- छाप्यानंतर कलमाडी यांची चौकशी होण्याची शक्यता- कॉमनवेल्थ व्हिलेज आणि जवाहरलाल नेहरू स्टेडिअमला भेट देण्याची शक्यता- उद्घाटनप्रसंगी वापरलेला 84 कोटींचा बलून ताब्यात घेण्याची शक्यताछाप्यात काय सापडलं?- अनेक कागदपत्रं, 2 लॅपटॉप, काही डिस्क ड्राईव्ह – टाईम स्कोअरिंग कॉन्ट्रॅक्ट्सच्या नोंदी – हे कॉन्ट्रॅक्ट ओमेगा या कंपनीला दिले होते – इतर कंपन्यांनी भरलेल्या टेंडर्सची न उघडलेली कागदपत्रं शिवसेना आणि भाजपचा ही कारवाई धूळफेक असल्याचा आरोप कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांच्या दिल्ली, पुणे आणि मुंबईतल्या घरांवर सीबीआयने छापे टाकले आहेत ही कारवाई धूळफेक असल्याचा आरोप शिवसेना आणि भाजपने केला आहे. तसेच या बाबतीत केवळ कलमाडीच नव्हे तर प्रकल्पांना मंजुरी कुणी दिली त्या सगळ्यांचीच चौकशी करा अशी मागणी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे.

close