राडिया यांच्या संबंधावरुन काँग्रेसने भाजपला फटकारलं

December 24, 2010 5:39 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबरकॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांच्याशी कथित संबंध असल्यावरून काँग्रेसने भाजपला फटकारलं आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्याबरोबर राडिया यांनी काही व्यवहार केले होते असा दावा राडिया यांच्या माजी सहकार्‍याने केला होता. एनडीएच्या काळात अनंत कुमार यांनी राडिया यांच्यासाठी कॅबिनेटमधले काही पेपर्स लीक केले होते असंही या सहकार्‍याने म्हटले आहे. यावरून भाजपचे लॉबिस्टबरोबरचे संबंध उघड होतात असं काँग्रेसने म्हटले होते. अनंतरकुमार यांना भाजपच्या सरचिटणीसपदावरून काढून टाकावे अशी मागणी काँग्रेसने केली.

close