चौथ्या दिवसअखेर भारताकडे 79 धावांची आघाडी

November 1, 2008 2:41 PM0 commentsViews: 6

01 नोव्हेंबर- दिल्ली, दिल्ली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 577 रन्सवर ऑलआऊट झाली आणि भारतानं 36 रन्सची नाममात्र आघाडी घेतली. मायकेल क्लार्कनं केलेल्या दमदार सेंच्युरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया फॉलोऑन टाळण्यात यशस्वी ठरली. क्लार्कनं 112 रन्सची खेळी केली. त्यानं वॉटसन आणि कॅमरुन व्हाईटबरोबर मोठी पार्टनरशीपही केली. भारतातर्फे वीरेंद्र सेहवाग यशस्वी बॉलर ठरला. त्यानं पाच विकेट घेतल्या. एकाच इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ ठरली. कॅप्टन अनिल कुंबळेनं तीन तर अमित मिश्रानं दोन विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.दुस-या इनिंगमध्ये खेळायला आलेल्या भारताची अडखळत सुरवात झाली. ओपनिंगला आलेला वीरेंद्र सेहवाग अवघ्या 16 रन्सवर आऊट झाला. तरतिस-या क्रमांकावर बढती देण्यात आलेला ईशांत शर्मा एकच रन्स करू शकला. चौथ्या दिवसअखेर 2 विकेट गमावत 43 रन्स करणा-या भारतानं 79 रन्सची आघाडी घेतली.

close