अहमदनगरमध्ये उत्साहात ख्रिसमस डे जल्लोषात साजरा

December 25, 2010 6:40 AM0 commentsViews: 3

साहेबराव कोकणे, अहमदनगर

24 डिसेंबर

ख्रिश्चन कमिटीने भारतात आल्यानंतर शिक्षणाचा आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी निवडलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. ख्रिश्चन मिशनरींनी सर्वप्रथम अहमदनगर शहरामध्ये मुलींसाठी "सेंट मोनिका क्लिरा बूझ, गर्ल्स हायस्कूलची" उभारणी केली. या कमिटीच्यावतीने नगर शहरात ख्रिसमस डे जल्लोषात साजरा करण्यात येतो. तसेच भारतीय आणि ख्रिस्ती खाद्यसंस्कृती जपत केक, रोल्ससोबतच करंजी, चकली, लाडू आणि शेव हे पदार्थही खास ख्रिसमससाठी बनवले जातात.अहमदनगर इथं राहणार्‍या या आहेत डॉ. शालिनी उजागरे. ख्रिसमसनिमित्त त्यांनी आपल्या घरी येणार्‍या पाहूण्यांसाठी फराळ तयार केला. ख्रिश्चन बांधवांमध्ये केक आणि रोल्सचं खूप महत्त्व असतं. याचबरोबर भारतीय संस्कृतीतील खाद्यपदार्थ करंजी, शेव, चकली, लाडू हे पदार्थ त्यांनी बनवले डॉ. उजागरेंनी बनवले आहेत. या कुंटुबाने घरामध्ये विविध सजावट केली आणि पाहूण्यांना ख्रिसमससाठी आमंत्रित केले.

ख्रिश्चन कमिटीने धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रथम अहमदनगर शहरापासून सुरूवात केली. मुंबईनंतर प्रथमच "गार्डन हॉल मेमोरीयल चर्च" नगरमध्ये बांधण्यात आले. शाळा, आरोग्य या सुविधांवरती जास्त भर देत त्यांनी धर्माचा प्रसार केला. आज अहमदनगर जिल्ह्यात 300 चर्च, 6 शाळा आणि बूथ सारखे हॉस्पिटल आहेत. एकूणच अहमदनगरमध्ये ख्रिश्चन धर्म जोपासल्या जात असून मोठ्या उत्साहात ख्रिसमस डे साजरा करण्यात येतो.

close