संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेचा गौरव !

December 25, 2010 8:10 AM0 commentsViews: 1

25 डिसेंबर84 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पुन्हा एक वाद चव्हाट्यावर आला आहे. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे अध्यक्षीय भाषण काही वेळापूर्वीच झाले आहे. तोच नवीन वादाला जन्म घातला आहे. संमेलमनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेचा गौरव करण्यात आला आहे. याबद्दल उत्तम कांबळे यांनी खुलासा करावा अशी मागणी सुनिता सु.र. यांनी केली आहे. स्मरणिकेच्या पान क्रमांक 69 वर हा उल्लेख आहे.

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेंचे स्मरण करण्यात आले आहे. यात नथुरामला महात्मा गांधींबद्दल आदर होता असा उल्लेख करण्यात आला आहे. गोडसेच्या जन्मशताब्दीनिमित्त हे स्मरण करण्यात आलं आहे. त्यामुळं नवा वाद सुरु झाला. अनेक मान्यवरांनी याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे संयोजकांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

close