राज ठाकरे एकाच जागी तीन तास शांत बसून ?

December 25, 2010 1:33 PM0 commentsViews: 94

25 डिसेंबर

शांत बसलेले राज ठाकरे हे तसं दुर्मिळ दृश्य..! पण आज हे दृश्य पहायला मिळालं. राजकीय घडामोडीबद्दल नेहमी त्वेषाने बोलणारे राज ठाकरे आज तब्बल तीन तास एका जागेवर शांत बसून होते. बरं ही कुठली राजकीय सभा नव्हती की कुठला राजकीय कार्यक्रम. राज ठाकरेंना शांत बसवून ठेवणारी व्यक्ती होती .आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासूदेव कामत. वासुदेव कामत यांनी आज राज ठाकरे यांचं पोर्ट्रेट रेखाटलं. या आधी वासुदेव कामत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच पोर्ट्रेट रेखाटलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन ताकदवान राजकारण्यांना तासनतास शांत बसवण्याची किमया चित्रकार वासूदेव कामत यांनी साधली. राज ठाकरे यांच्या जीवनातील अनेक घटना आणि राजकीय घडामोडी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी साधर्म्य साधणार्‍या आहेत. त्यात आता वासूदेव कामत यांनी रेखाटलेलं त्यांचं पोर्टेट हे याच साधर्म्याचे एक उदाहरण ठरलं आहे.

close