मुद्दा बरोबर पण आंदोलन चुकीचं- नारायण राणे

November 1, 2008 3:53 PM0 commentsViews: 2

1 नोव्हेंबर, मुंबईमहाराष्ट्र विरूद्ध बिहार हे आंदोलन चुकीचं असल्याचं मत महसूल मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. नितीशकुमार यांनी सर्वधर्म समभाव ठेवून वागावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ' राज ठाकरेंना कुठलंही समर्थन दिलेलं नाही. रेल्वेमध्ये महाराष्ट्रीय तरुणांनी नोकर्‍या मिळायला पाहिजेत. हा मुद्दा बरोबर आहे पण आंदोलनाचा मार्ग बरोबर नाही ',असं राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. परिषदेत राणेंनी शिवसेनेवरही हल्ला चढवला. ' सेनेत कोणाला कोणाचाच मेळ नाही. एक ना धड भाराभार चिंध्या असं चित्र आहे. मी कशाला पुन्हा त्या पक्षात जाऊ ', असं राणे शेवटी म्हणाले.

close