उध्दव ठाकरेंनी दहशतवादाबद्दल जपूनच विधान करावी – आर आर पाटील

December 25, 2010 1:51 PM0 commentsViews: 6

25 डिसेंबर

सण, उत्सव याचं औचित्य साधून अतिरेकी कारवाई करण्यासाठी मुंबईत घुसले अशी सुचना मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.या बाबत गृहमंत्री आर आर पाटील यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सुरक्षा व्यवस्थेच्या गराड्यात असणार्‍या उद्धव ठाकरेंनी खुशाल सण, उत्सव साजरे करावे. पण दहशतवादाबद्दल जरा जपूनच विधान करावीत असा टोला गृहमंत्री आर आर पाटलांनी लगावला. लोकांनी सण उत्सव साजरे करावेत की दहशतवाद्यांचे फोटो बघत बसावे, असं विधान उध्दव ठाकरे यांनी केलं होते. त्यावर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

close