अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी स्फोटक आणण्यासाठी वापरलेली कार सापडली

December 25, 2010 4:21 PM0 commentsViews: 4

25 डिसेंबर

2007 मधल्या अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा राजस्थान एटीएसने केला. कटातल्या आणखी 5 संशयितांचा नावं एटीएसच्या हाती लागली आहेत. तसेच बॉम्ब अजमेरमध्ये आणण्यासाठी वापरलेली कारही त्यांना सापडली आहे. इंदूरमधून गोध्रा आणि गोध्रा इथून अजमेरला या कारमधून बॉम्ब नेण्यात आले. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात ही कार सापडल्याचे एटीएसने सांगितले आहे. या बॉम्बस्फोटात 3 जण ठार तर 30 जण जखमी झाले होते.

close