कोळीवाडे स्थानिक कोळींच्या नावावर करा – शरद पवार

December 26, 2010 12:41 PM0 commentsViews: 3

26 डिसेंबर, मुंबई

संपुर्ण राज्यभरातले कोळीवाडे स्थानिक कोळी लोकांच्या नावावर करुन टाका, त्यातुन कोळी बाधंवांच्या निवारा आणि चरितार्थाचा प्रश्न सुटेल, अशी मागणी शरद पवार यांनी केली. मुंबईत मत्स्यगंधा महोत्सवात त्यांनी ही मागणी केली. पवार यांचं हे वक्तव्य मुंबई आणि अलिबागसारख्या समुद्र किना•यांलगतच्या जमिनींवर वसलेल्या कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने महत्वाचं मानलं जातंय. सीआरझेड कायद्यामुळे सध्या कोळीवाड्यांचा विकास करणं किंवा पुनर्विकास करणं शक्य होत नाहीये, त्यामुळे कोळीबांधवांचा विकास रखडलाय, अशी कोळी बांधवांची भावना आहे. त्यामुळे पवारांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

close