2-जी स्पेक्ट्रम प्रकरणी ए.राजा यांच्या नातेवाईकांची सीबीआय चौकशी

December 26, 2010 12:48 PM0 commentsViews: 4

26 डिसेंबर

ए.राजा यांची गेले दोन दिवस सीबीआयनं चौकशी केली. पण आता सीबीआयचा रोख आहे तो त्यांच्या पत्नी आणि राजांच्या इतर नातेवाईकांवर आहे. राजा यांची पत्नी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या कंपन्यांना स्पेक्ट्रम लायसन्स मिळालेल्या कंपन्यांकडून भरघोस फायदा झालाय.तर त्यांची पत्नी संचालक असलेल्या इक्वास इस्टेटचा टर्नओव्हर एका वर्षात एक लाखावरून सातशे कोटींवर गेलाय.तसंच त्यांचे भाऊ आणि सीए हेही संशयाच्या भोव-यात अडकलेत. त्यामुळे आता राजा यांच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

close