दादोजी कोंडदेव पुतळा हलवू नये यासाठी याचिका दाखल

December 26, 2010 1:01 PM0 commentsViews: 20

26 डिसेंबर,पुणे

दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवू नये यासाठी एक याचिका पुणे कोर्टात सादर केलीय. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी ही याचिका दाखल केलीय. पुणे महानगरपालिकेने पुतळा हटवण्याबाबत मंजूर केलेल्या प्रस्तावाला आक्षेप घेत बलकवडे यांनी पुणे महापालिकेच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान महानगरपालिकेनं या याचिकेवर कॅव्हेट दाखल केलंय.

close