‘स्वतंत्र मराठी विद्यापीठाच्या’ मागणीने साहित्य संमेलनाची आज होणार सांगता

December 27, 2010 9:54 AM0 commentsViews: 2

27 डिसेंबरठाण्याच्या 83व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रात स्वतंत्र मराठी विद्यापीठ स्थापन करावं अशी मागणी ठरावाद्वारे सरकारकडे केली जाणार आहे. त्याबरोबरच खासगी विनाअनुदानित मराठी शाळांना पूर्ण अनुदान देऊन या मराठी शाळा जगवाव्यात याचीही मागणी सरकारकडे केली जाणार आहे. तसेच बेळगाव- सीमा प्रश्न हा चर्चेद्वारे सोडवला जावा कोर्टात गेल्याने हा प्रश्न नेहमी प्रमाणे प्रलंबित राहील त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी हे ठराव मुख्यमंत्र्यांसमोर मांडले जाणार आहेत.

close