औरंगाबादमध्ये अशोक सिंघल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

December 27, 2010 10:28 AM0 commentsViews: 4

27 डिसेंबर

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. काही वेळातचं निदर्शनं करणार्‍या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी वेळीचं हस्तक्षेप केल्याने हा रास्ता रोको फसला. कार्यकर्ते कमी आणि पोलिसचं जास्त असल्याने या कार्यकर्त्यांनी अशोक सिंघल यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सिंघल यांना अटक झालीच पाहिजे, अशा घोषणा देत अवघ्या दहा मिनिटात हे आंदोलन संपले. औरंगाबाद शहर काँग्रेसतर्फे ही सिंघल यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याविरोधात अशोक सिंघल यांच्याविरूध्द औरंगाबादच्या सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी ही तक्रार दिली.

close