कर्नाटक स्थापनेचा निषेध सायकल रॅलीनं

November 1, 2008 3:57 PM0 commentsViews: 4

1 नोव्हेंबर, कर्नाटककर्नाटक स्थापना दिवसाचा निषेध करत बेळगावसह सीमावर्ती भागात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळा दिवस पाळला. कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून निषेध नोंदवला.1 नोव्हेंबर 1956 साली भाषिक प्रांतरचनेनुसार बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात विलीन करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हा दिवस म्हणून पाळण्यात येतो. कर्नाटक स्थापना दिवसाचा निषेध करण्यासाठी सायकल रॅलीमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकांना हौतात्म्य आलं. पण अजूनही तिथली आग धुमसतेय. दरवर्षी कर्नाटक स्थापना दिवस काळा दिवस म्हणून पाळला होता. ' गेली 54 वर्षे काळा दिवस पाळला जातोय. ही चळवळ शांतता मार्गानं सुरू आहे ', असं महाराष्ट्र एकीकरण समितीचे टी.के.पाटील सांगत होते.कर्नाटकाच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं दरवर्षी असा काळा दिवस पाळला जातो. पण बेळगावसह सीमावर्ती भागाचा प्रश्न सोडवण्यास अजुनही दोन्ही राज्यांच्या राज्यकर्त्यांना काही यश आलेलं नाही, हे सीमावर्ती भागातल्या लोकांचं दुर्देव आहे.

close