‘जन गण मन’ ची राष्ट्रगीत म्हणून घोषणा

December 27, 2010 10:40 AM0 commentsViews: 9

27 डिसेंबर

भारतीय राष्ट्र गीताचं हे शताब्दी वर्ष आहे. कोलकत्याला झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 27 डिसेंबर 1911 रोजी सर्वप्रथम हे गीत गायिले गेलं. स्वातंत्र्यानंतर घटना समिती स्थापन करण्यात आली. आणि या समितीने जन गण मनची राष्ट्रगीत म्हणून घोषणा केली.

भारतभूमीच्या सार्वभौमिकतेचं, विविधतेचं आणि एकतेच्या गीताला स्वातंत्रसैनिक रामसिंग ठाकूर यांनी संगीतबध्द केलं. कश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत एकासुत्रात बांधून ठेवणारं असं हे गीत आहे.या राष्ट्रगीतातून देशाची संस्कृती, इतिहास,परंपरा,वर्तमान याचे दर्शन होते. स्वनतंत्र्य भारताच्या राज्यघटनेनुसार आज राष्ट्रगीताला 99 वर्षेपूर्ण होऊन 100 वे वर्ष लागले. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या जन गण मन या भारताच्या राष्ट्रगीताला आज 99 वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यापूर्वी 40 वर्षे ह्या गीताची रचना करण्यात आली होती.

close