गोव्यात कडक सुरक्षा व्यवस्था

December 27, 2010 12:38 PM0 commentsViews: 1

27 डिसेंबर31 डिसेंबरच्या निमित्ताने गोव्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. ठिकठिकाणी अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहे. विशेषत: गोव्यातील समुद्रकिनारे आणि अतिसंवेदनशील जागी चोख सुरक्षाव्यवस्था आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशी तसेच परदेशी नागरिक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी गोव्यातली हॉटेल्सही सज्ज झाली. यावर्षी गोव्यात 21 लाख पर्यटक येतील अशी शक्यता आहे. तसेच हॉटेलच्या किंमतीतही 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचे हॉटेल मालकांचे म्हणणं आहे.

close