लोकलेखा समितीच्या चौकशीला कधीही तयार – पंतप्रधान

December 27, 2010 12:59 PM0 commentsViews: 1

27 डिसेंबर

आपण लोकलेखा समितीसमोर कधीही चौकशीला तयार असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी काँग्रेसच्या अधिवेशनात आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज कॅग प्रमुख विनोद राय हे संसदेच्या समितीपुढे हजर झाले. संसदेची लोकलेखा समिती सध्या या घोटाळ्याची चौकशी करत आहे. या घोटाळ्यामुळे करदात्यांचे 1.76 लाख कोटी रुपये बुडाले असा कॅगचा अहवाल होता. कोणत्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला याची माहिती विनोद राय समितीपुढे देणार आहेत. भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हे संसदीय समितीचे अध्यक्ष आहे. भाजपनं मात्र या घोटाळ्याप्रकऱणी जेपीसी चौकशीची मागणी केली आहे.

close