मुंबईत हाय अलर्ट जारी

December 27, 2010 2:48 PM0 commentsViews: 2

27 डिसेंबर

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीनुसार चार आतंकवादी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानुसार मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल परिसरात अत्याधुनिक हत्यारांसह पोलिसांची तसेच फोर्स वनची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. ताज हॉटेलची खाजगी सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला या परिसरात नागरिकांची खूप गर्दी असते. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याची विनंती केली आहे.

close