दादोजींचा पुतळा हटवण्यावरून पुणे महापालिकेत राडा

December 27, 2010 4:55 PM0 commentsViews: 5

27 डिसेंबर

लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काल मध्यरात्री पुणे महापालिकेनं हटवला. पुतळा हटवल्यानंतर आज सकाळपासून याप्रकराबद्दल तीव्र पडसाद उमटू लागले आहे. पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेच्या सुरवातीलाच शिवसेनेचे गटनेते शाम देशपांडे आणि भाजपचे गटनेते विकास मठकरी यांच्या नेतृत्वाखाली सेना भाजपच्या नगरसेवकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर श्याम देशपांडे यांनी महापौरांच्या जागेवरील टेबलच्या काचा फोडल्या. तर भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांनी महापौरांसमोरील माईक तोडले. पालिकेमधील भाजपचे कार्यालय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिल भोसले आणि भााजपचे मठकरी यांच्यात हाणामारी झाली.

दरम्यान, पुण्यातल्या नवी पेठ भागातल्या संभाजी ब्रिगेडच्या ऑफिसचीही तोडफोड करण्यात आली. सेना-भाजप नगरसेवकांनी हे ऑफिस फोडलं. शिवसेना -भाजपने राज्यभरातले कार्यकर्त्यांना पुण्यात बोलावून हा हल्ला घडवून आणला असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

close