डॉ. बिनायक सेन यांच्या जन्मठेप विरोधात देशभरात निदर्शन

December 27, 2010 5:51 PM0 commentsViews: 3

27 डिसेंबर

डॉ. बिनायक सेन यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. मानवाधिकार कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी आज दिल्लीत जंतरमंतरजवळ निदर्शनं केली. रायपूरमधल्या कोर्टाने बिनायक सेन यांना गेल्या शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आणि देशद्रोहाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.बिनायक सेन यांना सध्या कैदेत ठेवण्यात आलं आहे. कुणालाही त्यांची भेट घेण्याची परवानगी नाही. सेन यांना दिलेल्या शिक्षेचा मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक, कायदेतज्ज्ञ, विद्यार्थी या सर्व स्तरांतून निषेध होत आहेत. सेन यांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी त्यांनी केली. तर शिक्षेचा फेरविचार व्हावा, असं मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केलं.

close