पुणे मनपा तोडफोड प्रकरणी 32 नगरसेवकांवर गुन्हा दाखल

December 28, 2010 9:30 AM0 commentsViews: 2

28 डिसेंबर

दादोजींचा पुतळा हटवण्यावरुन पुण्यातल्या 32 राडेबाज नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 21 शिवसेना-भाजप नगरसेवक तर 11 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे. काल पुणे महानगरपालिकेत शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी तोडफोड केली होती. लालमहालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर पुणे मनपामध्ये नगरसेवकांनी धिंगाणा घातला.त्यानंतर आज अखेर या प्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close