अमरावतीच्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट

November 1, 2008 4:23 PM0 commentsViews: 19

1 नोव्हेंबर, अमरावतीप्रवीण मनोहरअमरावती विभागात यंदा मृग नक्षत्राचा पाऊस उशिरा आल्यानं खरीप हंगामात शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली होती. रब्बी हंगामातील हरभर्‍याच्या पिकावरही दुबार पेरणीची वेळ आली आहे. कारण मात्र वेगळं आहे. हरभर्‍याच्या पिकांवर ' कटवर्म' नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झालाय. किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातील एक संजयराणे हे शेतकरी. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. पाऊस कमी झाल्यानं त्यांनी खरीपाचं पिक घेतलेलं नाही. रब्बी हंगामात त्यांनी हरभर्‍याची पेरणी तर केली पण उगवलेल्या पिकावर ' कट वर्म' ने हल्ला चढवला. संपूर्ण शेतचं किडीनं उद्धवस्त केलं.' कटवर्म' मुळं राणे यांच्यावर दुबार पेरणीची पाळी आली आहे. एकट्या अकोला जिल्ह्यात 29 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी झालेली आहे. दुबार पेरणीमुळे उत्पन्नावर परिणाम होणार, हे तेवढचं खरं. ही किड जमिनीच्या खाली लपून बसत असल्यानं शेतकर्‍यायाला या किडीचा अंदाज येत नाही. ' ही कीड निशाचर आहे. रात्रीच्या वेळी सक्रीय असते. शेतकर्‍याच्या लवकर लक्षात येत नाही ', असं अकोल्याचे कृषी अधीक्षक सुनील आळसे यांनी सांगितलं. कृषी विभागानं ह्या किडीच्यासंदर्भात जनजागृती करत असल्याचं सांगितलयं पण शेतकरी मात्र कृषी विभागाच्या पाहणीसाठी वाट पाहत आहे. ' सचिवालयात गेलो होतो. त्याठिकाणी कृषी सहाय्यक मला मिळाले नाहीत. मी त्याची वाट बघतो आहे पण कुणीही आलेलं नाही ',असं सजय राणे सांगत होते. आधीच उशिरा पावसामुळं नापिकी झालेल्या शेतकर्‍यांना मदत ठरण्यार्‍या ह्या हरभर्‍याच्या पिकावर ही दुबार पेरणाची पाळी आल्यानं शेतकर्‍याची अवस्था आगीतुन निघून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे.

close