मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात

December 28, 2010 10:11 AM0 commentsViews: 17

28 डिसेंबरमुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूकीसाठी आज (मंगळवारी) मतमोजणी होत आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सिनेटच्या एकूण 108 जागांपैकी विद्यार्थी प्रतिनिधींच्या 10 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत काँग्रेसच्या एनएसयुआयला मनविसे, शिवसेनेच्या भाविसे आणि स्वाभिमान संघटनेच्या विद्यार्थी संघटनेने आव्हान उभे केले आहे. ही सिनेट निवडणूक आदित्य ठाकरेंची सक्रीय राजकारणातली पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे भाविसेच्या डावपेचांकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: या निवडणूकीत लक्ष घातल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली.

close