रॉयल्टीचा वाद सुरुचं; जावेद अख्तर यांच्यावर बंदी

December 28, 2010 11:26 AM0 commentsViews: 3

सोमेन मिश्रा, मुंबई

28 डिसेंबर

संगीतकार आणि गीतकार यांच्यातल्या रॉयल्टीचा वाद अजूनही चालु आहे. त्याचा परिणाम म्हणून जावेद अख्तर यांच्यावर फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने बंदी घातली आहे.

'मुन्नी बदनाम हूई', 'शीला की जवानी' अशा या गाण्यांनी संगीतकार आणि गीतकारांना भरपूर पैसे मिळवून दिले. पण रॉयल्टी या विषयावरच आता फिल्म इंडस्ट्रीत दोन गट पडले आहे. त्यातूनच फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं जावेद अख्तर यांच्यावर बंदी घातली.फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष रवी कोट्टरकर म्हणता की, आम्ही जावेद अख्तर यांच्याबरोबर काम करणार नाही असा निर्णय घेतला आहे. ते गीतकार आहेत. त्यांनाही फिल्म इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम्स कळले पाहिजेत. पण त्यांना कॉपीराइटमध्ये बदल हवे आहेत.

जवळ जवळ प्रत्येक संगीतकार आणि गीतकार यांना कॉपीराइट्समध्ये बदल हवेत. पण फेडरेशनने मात्र फक्त जावेद अख्तरवर बंदी घातली. त्यांनाही याचे आश्चर्य वाटत.जावेद अख्तर म्हणता की, मी पर्वा करत नाही. फार फार तर काय मला कुणी काम देणार नाही. पण तो काही मोठा विषय नाही. पण रॉयल्टी ही प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. काही दिवसांपूर्वी आमीर खानने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. आता तोही मागे झाला. याच प्रश्नावर निर्माते 6 जानेवारी 2011 रोजी संपावर जाणार आहेत.

close