तरच आम्ही नुकसान भरपाई देऊ – नीलम गोर्‍हे

December 28, 2010 11:41 AM0 commentsViews: 1

28 डिसेंबर

दादोजींचा पुतळा हटवण्यावरुन काल (मंगळवारी) सर्वपक्षीय नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तोडफोड केली होती. या तोडफोडीत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. या मालमत्तेची नुकसान भरपाई भरुन देणार का? असा प्रश्न विचारला असता शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखवली.

पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही भरपाई दिली तरच आम्ही भरपाई देणार अशी शिवसेनेची भूमिका आहे. पुणे महानगरपालिकेत काल सर्वपक्षीय नगरसेवकांनी गोंधळ घालत तोडफोड केली. टेबल, माईक्स, काचा फोडल्या. सेना भाजपची कार्यालय ही फोडली. सभागृहात लोकप्रतिनीधींनी घातलेल्या या गोंंधळावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करुन ही नुकसानभरापाई त्यांच्याकडून भरुन घेण्याची मागणी त्यांनी केली.

close