लक्ष्मणच शतक हूकले; द.आफ्रिकेला 303 रन्सचे टार्गेट

December 28, 2010 12:10 PM0 commentsViews: 2

28 डिसेंबर

डरबन टेस्टमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 303 रन्सचे टार्गेट ठेवले आहे. मात्र व्ही. व्ही. एस. लक्ष्मणची सेंच्युरी मात्र हुकली. लक्ष्मण 96 रन्सवर आऊट झाला. पण त्याच्या या शानदार खेळीने भारताला तीनशे रन्सचा टप्पा गाठून दिला. तळाच्या बॅट्समनना हाताशी धरत त्याने भारताला अवघड परिस्थितीतून बाहेर काढले. झहीर खानने त्याला चांगली साथ दिली. झहीर खान 27 रन्स करुन आऊट झाला.आफ्रिके तर्फे मॉर्केल आणि सोसोबेने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर डेल स्टेनला दोन विकेट घेण्यात यश आलं. आता मॅच जिंकण्यासाठी भारतीय बॉलर्सला पुन्हा एकदा आफ्रिकेला दणका द्यावा लागणार आहे.

close