पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद ; बुधवारी सांगली बंद

December 28, 2010 2:11 PM0 commentsViews: 4

28 डिसेंबरपुण्याच्या लालमहलातुन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळला आहे. शहरातील बरीचशी दुकानं दिवसभर बंद राहिली असली तरी शाळा, कॉलेजेसवर या बंदचा परिणाम झाला नाही. तसेच बस सेवा आणि रिक्षाही सुरू होत्या. काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. जवळपास 53 बसेस फोडण्यात आल्या आहे. पण एकूण पाहता शिवसेना-भाजपने पुकारलेल्या या बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण शिवसेनने हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला. पण जोपर्यंत दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुन्हा लाल महालात ठेवला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही शिवसेनेने दिला.

आता या पाठोपाठ सांगली बंदचं ही आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी सांगलीमध्येही पडसाद उमटत आहेत. उद्या (बुधवारी) सांगली बंदचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने आणि शिवप्रतिष्ठानने हे आंदोलन केले आहे. या संघटनांनी आज शहरात निदर्शन केली. शहराच्या मध्यवर्ती मारुती चौकातून मोर्चा काढण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी सांगली बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. भाजप आणि शिवप्रतिष्ठान यांनी मिळून उद्या सांगली बंदचे आयोजन केले.

लोणावळ्यात अत्यल्प प्रतिसाद

दरम्यान दादोजी कोंडदेव पुतळा हटवल्याप्रकरणी सेना भाजप आणि मनसे यांनी पुकारलेल्या बंदला लोणावळ्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बाजारपेठ, गवळी वाडा, भांगरवाडी, खंडाळा या भागातील भाजप सेना आणि मनसे कार्यकर्त्यांची दुकान वगळता बाजारपेठा सुरु होत्या. आज सकाळी लोणावळा इथं सिंहगड आणि इंदौर एक्सप्रेस रोखण्यात आली. बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी दाखल झालेल्या पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

माणिकराव ठाकरे यांनी निषेध व्यक्त केला

पुणे महानगरपालिकेत घातलेला राडयाला माणिकराव ठाकरे यांनी निषेध केला. महापालिकेच्या सभागृहाने बहुमताने घेतलेला निर्णय अंमलात आणला तर गोंधळ करण्याचे कारण काय? असा प्रश्न माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला.

close