संजय दत्तची प्रॉपर्टी जप्त करा !

December 28, 2010 2:35 PM0 commentsViews: 4

28 डिसेंबर

बॉलीवुडमध्ये मुन्नाभाई म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता संजय दत्त आता अडचणीत सापडला आहे.संजय दत्तची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. जान की बाजी सिनेमाचं शूटिंग अर्धवट सोडल्यामुळे निर्मात्याने कोर्टात धाव घेतली होती त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा आदेश काढला. शकील नूरानी या निर्मात्याने संजय दत्तविरोधात ही केस दाखल केली होती.

2002 मध्ये जान की बाजी या चित्रपटाची सुरुवात झाली होती.या चित्रपटात संजय दत्त सोबत प्रियंका चोप्रा आणि डैनी आदी कलाकार काम करत होते. संजय दत्त यांनी मध्येच चित्रपट सोडल्यामुळे खूप नुकसान झाले आहे.

close