सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे आव्हान स्वीकारलं पाहिजे – चिदंबरम

December 28, 2010 2:41 PM0 commentsViews: 2

28 डिसेंबर

नक्षलवाद्यांची ताकद आम्ही ओळखून आहोत आणि सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे आव्हान स्वीकारलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केले. चिदंबरम यांनी आज गडचिरोलीचा दौरा केला. सेंट्रल पॅरामिलटरी फोर्सच्या आधारे 2009 मध्ये सुरु केलेल्या ऑपरेशन ग्रीन हंटचा आढावा घेण्यासाठी हा दौरा करण्यात आला. या दौर्‍याच्या सुरवातीलाच गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश राज्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर पी. चिदंबरम यांनी विदर्भातील नक्षल प्रभावित भाग मुरुमगाव आणि धानोरा इथं भेट दिली. मुरुमगावमध्ये नक्षली हल्ल्यात 14 जवान शहीद झाले होते. तर धानोर्‍यात नक्षलवाद्यांकडून ग्रामपंचायत उडवण्यात आली होती. त्यामुळे पी चिंदंबरम यांनी या भागाला दिलेली भेट महत्वाची आहे. इथे त्यांनी सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली. आणि सुरक्षारक्षक जवानांसोबत संवादही साधला. चिदम्बरम यांची ही पहिलीच गडचिरोली भेट आहे. राज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्याच्या नक्षलविरोधी ऑपरेशनबद्दल माहिती दिली.

close