गोंदियात सहा नक्षलवाद्यांना अटक

December 28, 2010 2:46 PM0 commentsViews: 2

28 डिसेंबर

गोंदिया जिल्हयातील नक्षलविरोधी पोलिस पथकाने सहा नक्षलवाद्यांना अटक केली. यापैकी 2 नक्षलवादी अमरावतीचे एक चंद्रपूरचा तर तीन नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील आहेत. या नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर हत्यार आणि सात हजार रुपये आणि एक कार जप्त केली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी भीमराव भावते हा नक्षलवाद्यांसाठी 1987पासून काम करतो. त्याच्याकडून पोलिसांना अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रंही मिळाली आहेत. पोलिसांच्या दृष्टीने ही मोठी कारवाई असल्याचे मानले जाते.

close