अमेरिकेत निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात

November 1, 2008 5:11 PM0 commentsViews: 3

1 नोव्हेंबर, वॉशिंग्टनअमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आता जवळ येऊन ठेपली आहे. 4 नोव्हेंबरला त्यासाठी मतदान होईल. डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामांची मात्र या शेवटच्या काही दिवसात पिछेहाट झाली आहे. ताज्या रॉयटर्स जॉन झॉर्ग्बाच्या पोलनुसार ओबामा आता मॅककेन यांच्या पेक्षा 9 पॉइंटसनी आघाडीवर आहेत. शुक्रवारी त्यांची आघाडी होती 10 पॉइंट्सची आणि गुरुवारी ओबामा मॅककेन पेक्षा 12 पॉइंटस्‌नी पुढे होते. गॅलपच्यानुसार ओबामांची आघाडी प्रत्यक्षात याहूनही कमी आहे. आर्थिक मुद्यांचा फोकस आणि नकारात्मक भाषेचा कमीतकमी वापर मॅककेन यांच्या फायद्याचं ठरतंय. डेन्व्हर मधील एका गजबजत्या रॅलीत मॅककेन नुकतेच बोलत होते. तिथे त्यांनी आपल्या समर्थकांना बजावलं की ओबामांना निवडून देणं म्हणजे करवाढीला आमंत्रण देणं. आर्थिक सुधारणांसाठी करवाढ, हा काही योग्य मार्ग नव्हे. नवीन नोकर्‍या निर्माण करणे आणि निर्माण झालेली संपत्ती सर्वांपर्यंत पोहोचवणे, हे खरं प्रगतीचं लक्षण आहे. आता मॅकेकन यांचं लक्ष मध्यमवर्गांकडे केंद्रीत झालंय. सारा पॉलिन यांची हेअर स्टाईल या निवडणुकीतील चर्चेचा विषय आहे. इतकं की त्यांच्या हेअर स्टाईलसारखे केसांचे टोप अचानक जास्त खपू लागले आहेत. ऑर्थोडॉक्स ज्यू बायकांमध्ये हा टोप एकदम पॉप्युलर झालाय. याचा मात्र उलगडा होत नाही. अर्थात पॉलिनबाईंचा केसांचा टोप काही फारसा स्वस्त नाहीय. त्याची किंमत आहे 695 डॉलर्स म्हणजे जवळजवळ 25 हजार रूपये. एकंदर अमेरिकेत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालं आहे.

close