सिनेट निवडणुकीत युवा सेनेची विजयी सलामी

December 29, 2010 8:41 AM0 commentsViews: 11

29 डिसेंबर

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल लागायला आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लागलेल्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने बाजी मारली आहे. युवासेनेनं त्यांची अंगिकृत संघटना भारतीय विद्यार्थी सेनेमार्फत उमेदवार उभे केले होते. महिलांच्या राखीव गटातून युवासेनेच्या निलीमा भुरके, भटक्या जमातीतून शशीकांत जोरे आणि एस.सीमधून संजय वैराळ विजयी झाले. तसेच एस.टी मधून तुषार कुमारे आणि ओबीसीमधून राजन कोळंबेकर विजयी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरू झाली होती. ही निवडणूक आदित्य ठाकरेंची सक्रीय राजकारणातली पहिलीच निवडणुक आहे.

close