आदर्श प्रकरणी अधिकार्‍यांचा राजीनामा द्यायला नकार

December 29, 2010 9:01 AM0 commentsViews: 1

29 डिसेंबरआदर्श घोटाळ्याप्रकरणी राजीनामा द्यायला सांगितलेले सनदी अधिकारी रामानंद तिवारी आणि सुभाष लाला यांना आपण मुख्य सचिव जे.पी.डांगे यांची भेट घ्यायला सांगितले होते. मात्र त्यानंतर काय झालं हे आपल्याला माहिती नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.राजीनामा द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा अशी मुख्यमंत्र्याची सुचना असतानाही, रामानंद तिवारी आणि सुभाष लाला या सनदी अधिकार्‍यांनी राजीनाम्यास नकार दिला होता. त्यांना आज राजीनाम्यासाठी आज संध्याकाळपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तिवारी माहिती आयुक्त आहेत तर लाला मानवी हक्क आयोगाचे सदस्य आहेत. आपल्या आदर्श घोटाळयाची काहीही संबंध नाही असाच पवित्रा त्यांनी घेतला. या दोघांनीही काल मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुख्य सचिव जे. पी. डांगेंना भेटायला आणि त्यांना माहिती देण्यास सांगितले होते.

close