सांगलीत कडेकोट बंदोबस्त ; 15 अटक

December 29, 2010 9:12 AM0 commentsViews: 1

29 डिसेंबर

लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्या प्रकरणी काल मंगळवारी पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ आज बंद आहेत. भाजप, शिवसेना आणि शिवप्रतिष्ठाननं हा बंद पुकारला. या पार्श्वभूमीवर सांगलीत आज कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. विक्रामबाग परिसर जबरदस्ती बंद करण्यास लावत होते म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर मिरजेतही 15 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

close