अरूण बोरूडेचा संशयास्पद मृत्यू

December 29, 2010 11:44 AM0 commentsViews: 1

29 डिसेंबर

पवई इथं अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातला प्रमुख आरोपी अरुण बोरुडेचा श्रीरामपूरजवळ रेल्वेट्रॅकवर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. काही वेळापूर्वीच ही घटना उघडकीला आली. हा अपघात आहे की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांची एक टीम अहमदनगरकडे तपासासाठी रवाना होणार आहे.

पवईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोरुडेवर आरोप आहे. बोरूडेवर पवई आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील पवई पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे तर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीररित्या इमारतीत घुसण्याचा गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणातील घटनाक्रम

मार्च-2010मध्ये अंधेरीतल्या एमरॉल्ड कोर्ट सोसायटीच्या फ्लॅट नंबर 404 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कारऑक्टोबर 2010- पीडित मुलीनं एका मुलाला दिला जन्मगायकवाड हिच्याविरोधात एफआयआर दाखल9 नोव्हेंबर अरुण बोरुडेविरोधात एफआयआर दाखल16 नोव्हेंबरला पोलीस महासंचालकांनी आपला विशेषाधिकार वापरून अरूण बडतर्फ केल17 नोव्हेंबर – बोरूडे फरार घोषित18 नोव्हेंबर – बोरूडेचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन कोर्टाने फेटाळला20 डिसेंबर – हायकोर्टाने बोरूडेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

close