आसाम स्फोटामागे उल्फाचाच हात असल्याचं उघड

November 1, 2008 5:12 PM0 commentsViews: 2

आसाम स्फोटामागे उल्फाचाच हात असल्याचं उघड 1 नोव्हेंबर- गुवाहाटी, आसाममध्ये झालेले स्फोट उल्फा या संघटनेनचं बांग्लादेशी अतिरेक्यांच्या सहाय्यानं घडवून आणल्याचं आता स्पष्ट होतं आहे.त्याशिवाय या स्फोटासाठी त्यांना बांगलादेशच्या गुप्तचर यंत्रणांनीही मदत दिल्याचं तपासात समोर येतंय. याशिवाय उल्फाच्या अतिरेक्यांना बांग्लादेशात खास प्रशिक्षण दिल्याची बाबही आता समोर येतेय. एप्रिल, मे महिन्यात बांग्लादेशमधल्या चितगाव इथं उल्फाच्या अतिरेक्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. त्यात काही पश्चिम बंगाल आणि पूर्वांचलमधली आदिवासी तरुणही होते. पूर्वांचलमधल्या अनेक बंडखोर संघटना ढाक्यात राहून कारवाया करत आहेत, असं आता उघड झालंय. याप्रकरणी भारतानं बांग्लादेशला 100 संघटनांची यादी दिली आहे. या सर्वांना बांग्लादेशमध्ये आश्रय देण्यात आल्याचं भारताचं म्हणणं आहे. माजी पोलिस अधिकारी, डी.जी.श्रीवास्तव यांच्यामते उल्फाचं स्वरुप आता बदलतंय. आसाममधील उल्फा बंडखोराशिवाय त्यांचा एजेंडा राबविणा-या तरुणांनाही उल्फानं पैसे देवून विघटनवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.

close