मुंबईत नववर्षाचं स्वागतसाठी कडेकोट बंदबोस्त

December 29, 2010 12:37 PM0 commentsViews: 4

29 डिसेंबर

नववर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला सगळीकडेच उत्साह असतो. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर घातपात होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली. शहरभर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. प्रत्येक गाडीची तपासणी केली जातेय. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले त्याचबरोबर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली. तसेच गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात पार्किंगला परवानगी नाकारण्यात आली. तसेच 31 डिसेंबरला रात्री दहा वाजल्यानंतर फटाक्यांवर बंदी कायम राहणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

close