कांद्याची निर्यातबंदी उठवावी मागणीसाठी बनियन मोर्चा

December 29, 2010 12:54 PM0 commentsViews: 8

29 डिसेंबर

कांद्याचा भाव काही दिवसांपूर्वी चांगलाच वाढला होता. काद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र यामुळे शेतकर्‍यांना या बंदीचा फटका बसला आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बनियन मोर्चा काढला. कांद्याच्या माळा गळ्यात घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे कार्यकर्त आले होते. कांद्यावरची निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी कांद्याला हमीभाव मिळावा आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

close