महाराष्ट्र जसा आपला तसाच तो त्यांचाही आहे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

December 29, 2010 1:46 PM0 commentsViews: 52

29 डिसेंबरशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज नाव न घेता सगळ्याच राजकीय पक्षांना फटकारलं. बिहार हा परप्रांत नाही असं स्पष्ट पणे सांगताना मला कानडी येत नाही, बंगाली येत नाही तरी बंगाल आणि कर्नाटक हे माझे आहेत. महाराष्ट्र जसा आपला तसाच तो त्यांचाही आहे. बिहारला परप्रांत म्हणू नका असं मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त करत नाव न घेता मनसे आणि शिवसेनेला फटकारलं आहे. तर दुसरीकडे हिरकणीची कथा दंतकथा बनली आहे. पण या कथेचे ऐतिहासिक पुरावे सापडायचे आहेत. साहित्याचा आनंद घ्यायला शिका. जसाच्या तसा अर्थ काढु नका असं म्हणत त्यांनी सध्या सुरु असलेल्या दादोजी कोंडदेव यांच्या वादावरती थेट न बोलता अप्रत्यक्ष भाष्य करत काँग्रेस राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडलाही टोला लगावला. पुण्यामध्ये हिरकणी या चित्रपटाच्या म्युझिक रिलिज झाले त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी भाषण करताना पुरंदरेंनी हे मुद्दे मांडले. नंतर मात्र त्यांनी या वादावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं.

close