भगव्या दहशतवादाची पाळंमुळं खोलवर असू शकतात

November 1, 2008 2:59 PM0 commentsViews: 5

1 नोव्हेंबर , मालेगाव मालेगाव बॉम्बस्फोटांत हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भगव्या दहशतवादाचं कधी नव्हे इतकं अतिरेकी स्वरूप समोर आलं आहे. मालेगावचा बॉम्बस्फोट हिंदुत्त्ववादी संघटनांनीच घडवून आणला, हे आता पुरव्यानिशी स्पष्ट झालंय.या स्फोटात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. साध्वी प्रज्ञासिंगसह तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली तर स्फोटकं पुरवल्याच्या संशयावरून माजी लष्करी अधिका-यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे भगव्या दहशतवादाची पाळंमुळं इतक्या खोलवर असू शकतात यावर मुस्लीम राजकारणीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. भगवा दहशतवाद देशासाठी अधिक घातक होऊ शकतो. त्यामुळे हिंदुत्त्ववादी संघटनांवर बंदी आणण्याची मागणी समाजवादी पक्षानं केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामुळे दहशतवादाला जात-धर्म नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

close