दादोजींचा पुतळा बसवावा यासाठी पुण्यात सेनेची सह्यांची मोहीम

December 29, 2010 2:59 PM0 commentsViews: 2

29 डिसेंबर

दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुन्हा लालमहालात बसवावा यासाठी शिवसेनेने पुण्यात सह्यांची मोहीम सुरू केली. लाल महालाजवळच आजपासून या मोहीमेला सुरूवात करण्यात आली. 15 जानेवारीपर्यंत लाखो सह्या गोळा करण्यात येणार आहेत. सह्यांसोबत बॅनर्सवर नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेण्यात येत असून एक प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. पुणे शहरासोबत ग्रामीण बागातही ही सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे.

close