कुमार केतकर यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार प्रदान

December 29, 2010 4:29 PM0 commentsViews: 11

29 डिसेंबर

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. सहयाद्री अतिथीगृहामध्ये आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे संपादक, वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.

close