गडचिरोलीच्या उपजिल्हाधिकार्‍यांवर कारवाईची शक्यता

December 29, 2010 4:36 PM0 commentsViews: 2

29 डिसेंबर

केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी काल गडचिरोलीचा दौरा केला. ऑपरेशन ग्रीन हंटचा आढावा त्यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. आणि नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या. या दौर्‍यावेळीच गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कानफाडे यांनी सरकारवरच टीका करणारे विधान केले होते. गडचिरोली जिल्ह्याचा विकास दिल्लीतून होणार नाही, त्यासाठी स्थानिकांना विश्वासात घ्यावे लागेल. तसेच निमलष्करी दलाचे जवान काढून घ्यावे लागतील अशी टीका कानफाडे यांनी केली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

close