काँग्रेस नेत्यांच्या जैतापूर दौर्‍याला स्थानिकांचा कोणताही प्रतिसाद नाही

December 29, 2010 4:53 PM0 commentsViews: 2

29 डिसेंबरराज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या सहा सदस्यांच्या समितीने आज जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेची मत जाणून घेण्यासाठी या परिसराचा दौरा केला. स्थानिक जनता आणि प्रकल्पविरोधी संघटनांनी आपल्याशी चर्चा करावी अशी या समितीची अपेक्षा होती. पण त्यांना स्थानिक जनतेचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करुनच त्यांना माघारी परतावे लागले. आधी मिठगावणे गावात गेलेली ही समिती नंतर नाटे गावातही चर्चेसाठी गेली, त्या ठिकाणी जमलेल्या मच्छिमार समुदायाने कोणत्याही परिस्थितीत आपण हा प्रकल्प स्वीकारणार नाही असं ठणकावून सांगितले. या मच्छिमारांनी मीडियालाही शूटिंग करायला नकार दिला. या सहाजणांच्या गटात पत्रकारांना आपली भूमिका सांगावी की नाही यावरही दोन गट पडले होते. त्यामुळे एकंदरीतच काँग्रेस समितीचा हा दौरा केवळ सोपस्कारच ठरला. प्रकल्पग्रस्तांचा विरोध अजूनही कायम असून मुख्यमंत्री स्वत: आपल्या समस्या जाणून घ्यायला का येत नाहीत असा संतप्त सवालही स्थानिकांकडून विचारला जात होता.

close