आरुषी हत्याप्रकरणाची फाईल सीबीआयनं बंद केली

December 29, 2010 6:06 PM0 commentsViews: 1

29 डिसेंबर

नोएडातल्या आरुषी तलवार हत्याप्रकरणाची फाईल सीबीआयनं बंद केली. याबाबतचा अहवाल सीबीआयने गाझियाबाद कोर्टात आज सादर केला. आरुषी हत्येचे प्रकरण चौकशीच्या पलीकडे गेले आहे. त्यात सुधारणा होण शक्य नाही, असं सीबीआयने अहवालात म्हटलं आहे. या प्रकरणातले महत्त्वाचे पुरावे अतिशय वाईट पद्धतीने हाताळले गेल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.आरुषी हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी नवी टीम स्थापन करण्यात आली होती. पण त्या टीमला फक्त आरुषीचा मोबाईल शोधणं शक्य झाल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. मे 2008 मध्ये आरुषी तलवार ही 14 वर्षांची शाळकरी मुलगी तिच्या नोएडातल्या घरात मृतावस्थेत आढळली होती.

close